Join Us

संपर्क 98 50 33 81 85 दैनिक साम्राज्य न्यूज चैनल प्रतिनिधीसाठी, जिल्हा प्रतिनिधी ब्यूरो चीफ, स्टेट हेड ,तसेच दैनिक साम्राज्यचे प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांनी संपर्क मुख्य संपादक सुखदेव जाधव मो. 98 50 33 81 85

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव-कातवी मधील ५१ ज्येष्ठ नागरिकांना PMPL बस सेवेचा मोफत पासचे वाटप

Responsive Ad Here


 वडगाव मावळ, ता.१५: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव-कातवी मधील ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी PMPL बस सेवेचा मोफत पासचे वाटप  करण्यात आले.

        वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वडगाव शहरातील वय वर्षे ६० पूर्ण असणाऱ्या ५१ जेष्ठ नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात मोफत बस सेवेचे पास वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत बस पास सेवेचा उपक्रम हा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिला. 

    तसेच वडगाव शहरातील  कोणत्याही जेष्ठ नागरिकांना दररोजचा किंवा महिन्याचा पास काढून पाहिजे असल्यास जनसंपर्क कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून  पास घेऊन जावे असे आव्हान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

   


  

 यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी सरपंच नंदाताई ढोरे, वडगाव राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष शांताराम कुडे, नितीन  भांबळ, अॅड शामराव ढमाले, चंद्रकांत झरेकर, हभप विठ्ठल ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, वडगाव राष्ट्रवादी काँग्रेस  सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, प्रभाग क्रमांक सात चे अध्यक्ष अशिष भालेराव,  अजय भवार, किरण ओव्हाळ, विकी कदम आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.